
कृषि उत्पन्न बाजार समिती,धामणगांव रेल्वे
शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शासनाने पुर्वीच्या कायद्यात आमुलाग्र बदल करुन त्यात शेतक-यांच्या हिताच्या अनेक दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना हैद्राबाद प्रेसीडेन्सी ऑर्डर नोटीफीकेशन क्र.79/Aदिनांक 1 एप्रिल 1898 रोजी झाली असुन सदरहु बाजार समितीने शतकोत्तर 28 वर्ष यशस्वीपणे पुर्ण केली आहेत. या बाजार क्षेत्रातील समस्त शेतकरी बांधवांकरीता ही भुषणावह बाब आहे.
सर्व्हे नं. 15.3 हे.19 आर जागा कापुस बाजार म्हणुन घोषीत करण्यात आली.सदर आदेशान्वये स्थापन झालेल्या बाजार क्षेत्राची मर्यादा त्यावेळच्या बेरार कॉटन ॲण्ड ग्रेन मार्केट लॉ चे कलम 4 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रुल्स 54(2) खाली काढण्यात आलेल्या नोटिफीकेशन क्र.5893 –XIV दिनांक 05/07/1933 अन्वये कॉटन मार्केटची एरीया दिड मैल रेडीयस (गोलाकार)अशी वाढविण्यात आली.
सर्व माहितीसाठी....